नागकन्या (आई सातेरी देवी) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु. तानिया समिल जळवी..
⚡कुडाळ ता.०२-: मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या “आई तू सातेरी माऊली ग” या मराठी गाण्याचा (गोंधळ गाणं ) व्हिडीओ बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी रिलीज झाला. यामध्ये देवीची मध्यवर्ती भूमिका कुडाळची बालकलाकार कु. तानिया समिल जळवी हिने साकारली आहे.
साडेसात मिनिटाच्या या व्हिडीओ गाण्यामध्ये जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला देवगड या तालुक्यातील छोट्या -मोठ्या वेगवेगळ्या कलाकारांचा समावेश आहे. या गाण्याची संपूर्ण कोरिओग्राफी कुडाळ येथील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि पी. के. डान्सचे संस्थापक प्रसाद कमतनूरे यांनी केली आहे.
या व्हिडिओ सॉन्ग मध्ये मालवण तालुक्यातील बिळवस येथील जल मंदिर दाखवण्यात आले आहे. बिळवस येथील सातेरी देवीची प्रचिती कशी आहे हे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून चित्रीकरण करून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एक आजी बिळवस गावात असलेल्या सातेरी जलमंदिरात गावातील वार्षिक उत्सवानिमित्त रात्रीच्या वेळी आपल्या घरातून सातेरी मंदिरात जाण्यासाठी काठी टेकत…टेकत बाहेर पडते. चालत असताना अंधार पडल्याने ती, आपली वाट चुकते. त्याच वेळी त्या चुकलेल्या आजीला एक छोटी मुलगी हात धरून त्या सातेरी जल मंदिरात घेऊन येते. आजी मंदिरात आल्यानंतर ती छोटी मुलगी आजीला दिसत नाही. ती मुलगी अचानक गायब होते. आजी आश्चर्यचकित होते. त्यावेळी त्या आजीला समजते की, हीच ती “सातेरी देवी ” जी मला चुकलेली वाट दाखवत.. दाखवत.. माझा हात धरुन सातेरी मंदिरात मला घेऊन आली असावी असे त्या आजीला वाटते.
या व्हिडीओ गीतामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांनी काम केले आहे. नागकन्या (आई सातेरी देवी ) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु. तानिया समिल जळवी हिने तर, आजीच्या भूमिकेत आशालता लवू तोंडवळकर वेर्ली, मालवण यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय अमोल सावंत, असगणी मालवण, गणेश कुंभार, तळवडे-सावंतवाडी, कु. चैताली श्रीराम पालव, बिळवस – मालवण, कु. हर्षाली दीपक पालव,बिळवस – मालवण हे कलाकार आहेत.
नृत्य कलाकार कु. सुमन रमेश चव्हाण, कुडाळ, कु. क्रांती लक्ष्मण पालव,बिळवस – मालवण, कु. हर्षदा दीपक पालव, बिळवस – मालवण, कु. श्रीईन औयुब खान, कणकवली, कु. दुर्वा विनोद चव्हाण कणकवली. तसेच लक्ष्मण पद्माकर पालव, बिळवस – मालवण, श्रीराम गावडे, साळेल, मालवण, राज प्रदीप चव्हाण, माळगाव मालवण, विराज कदम, किंजवडे, देवगड हे कलाकार यामध्ये आहेत.
याशिवाय कु. केतकी संतोष पालव, बिळवस – मालवण, कु. नेहा आंनद पालव बिळवस – मालवण, कु. अमृता आनंद पालव, बिळवस – मालवण, कु. हर्ष आनंद पालव, बिळवस – मालवण, कु. मानसी लक्ष्मण पालव, बिळवस – मालवण, उर्मिला लक्ष्मण पालव, बिळवस – मालवण, आर्या लक्ष्मण पालव, बिळवस – मालवण, गौरव लक्ष्मण पालव, बिळवस – मालवण, रिया श्रीराम पालव, बिळवस – मालवण, शाफिना औयुब खान, कणकवली अश्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
या गाण्याचे दिग्दर्शन, कार्यकारी निर्माता, प्रोडक्शन मॅनेजर, कास्टिंग डायरेक्टर प्रकाश पालव आहेत. त्यांच्या https://youtube.com/@prakashpalav316?si=pXAmg7e_jFEIlSqm या यु ट्यूब चॅनेलवर हे व्हिडिओ गाणं सर्वत्र रिलीज झालं आहे. या गाण्याचे सहाय्यक निर्माता बिळवस मालवणचे प्रशांत पालव आहेत.
