केसरकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जिल्ह्यात मोठ आंदोलन उभारून राजीनामा देण्यास भाग पाडू…

परशुराम उपरकर यांचा इशारा: ठाकरे शिवसेनेवर चुकीच्या पद्धतीने आरोप केला तर जिल्ह्यात केसरकर यांना फिरणं देखील मुश्किल होईल…

⚡सावंतवाडी, ता.०२-: अशोक खरात प्रकरणात जशी रूपाली चाकणकर यांची एस आय टी चौकशी लावण्यात आली, त्याच धर्तीवर आमदार दीपक केसरकर यांचीही चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली. जर केसरकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरू झाली नाही, तर ठाकरे शिवसेना जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारून त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

उपरकर पुढे म्हणाले, खरात प्रकरण अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे. या प्रकरणातील बाबी ज्या पद्धतीने समोर येत आहेत, त्या पाहता ही लाजिरवाणी बाब आहे. स्थानिक आमदार केसरकर हे खरात यांचे समर्थक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या आशीर्वादामुळेच खरात मोठ्या लोकांच्या संपर्कात आले, तसेच केसरकर यांनी सावंतवाडीचे नाव राज्यात बदनाम केलय आहे. त्यामुळे अशा व्यक्तीने आमदार पदावर राहणे योग्य नसून त्यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे, अन्यथा ठाकरे शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, “इतर अनेक आमदार असताना मलाच का दोष दिला जातो?” असा सवाल केसरकर करत असले तरी, त्यांच्या विरोधातील अनेक पुरावे माध्यमांसमोर आले आहेत,.त्यामुळे केसरकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सावंतवाडी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर केसरकर यांनी केलेली चुकीच असून आम्हाला कोणाच्याही अमिषाची व पैशाची गरज नाही, ठाकरे शिवसेना कोणाच्याही पैशावर जगणारे नाहीत जर चुकीच्या पद्धतीने केसरकर ठाकरे सेनेवर बोलत असतील तर केसरकर यांना जिल्ह्यात फिरण ठाकरे शिवसेना कठीण करतील,असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी त्यांनी शिंदे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून वेंगुर्ले येथील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा देखील समजतय,परंतु आशा धमक्यांना ठाकरे शिवसेना कधीच भीक घालणार नाही, वेळ पडल्यास त्यांच्या घरांवर मोर्चे काढले जातील, असा इशाराही उपरकर यांनी यावेळी दिला.

You cannot copy content of this page