जिल्ह्यातील यापुढे सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार-:खा विनायक राऊत….
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे या पंधरवड्यात दोन लाख सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे यासाठी तालुकावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली….
