मालवणातील विवाहिता लहान मुलासह बेपत्ता

*💫मालवण दि.२७-:* मालवण शहरातील गवंडीवाडा येथील विवाहिता सौ. अवनी सुमित माशेलकर (वय-२१) ही मुलगा माहीर (वय-दीड वर्षे) याच्यासह काल दुपारी अडीच वाजल्यापासून बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर पती सुमित माशेलकर यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी बेपत्ता विवाहिता अवनी माशेलकर हिचा पती सुमित याने मालवण पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार टेलरिंगचा क्लास संपल्यानंतर काल दुपारी गवंडीवाडा येथील संकल्प बिल्डिंग येथे पत्नी अवनी हिला सोडले व तो हॉटेलवर कामासाठी गेला. दुपारी कामावरून घरी आल्यानंतर सुमित याला पत्नी अवनी व मुलगा माहीर घरी नसल्याचे दिसून आले. त्यांचा शोध घेतला असता ती दोघीही सापडून आले नसल्याचे सुमितने पोलिसांना सांगितले. याबाबत मालवण पोलिस स्थानकात विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. जी. मोरे तपास करत आहेत.

You cannot copy content of this page