*💫मालवण, दि.२७-:* अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या तिन्ही संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी भूषण माडये, प्रथमेश ढोलये, केशव फोंडबा या तीन संशयितांविरोधात बलात्कार, माहिती तंत्रज्ञान तसेच पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास महिला पोलिस अधिकारी संध्या गावडे या करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी त्या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी
