सावंतवाडीत जिल्हा कॉंग्रेस कडून ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

*💫सावंतवाडी दि.२७-:* काँग्रेसचे जेष्ठ नेते स्वर्गीय अहमद पटेल यांना जिल्हा कॉंग्रेस कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, सावंतवाडी तालुका काँग्रेस कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बाळा गावडे, उपाध्यक्ष ऍड.दिलीप नार्वेकर, सरचिटणीस श्री. राजेंद्र मसुरकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे, शहराध्यक्ष ऍड.राघवेंद्र नार्वेकर, तालुका प्रवक्ता संभाजी सावंत, ओबीसी सेल अध्यक्ष अभय मालवणकर, माजगाव विभागीय अध्यक्ष विल्यम सालढाणा, युवक काँग्रेस शहराध्यक्ष साद शेख, संजय लाड, मंजुषा डांगी, ऍड विराग मसुरकर, संजय राऊळ, रुपेश आईर, प्रवीण सावंत, नेल्सन फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page