*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे या पंधरवड्यात दोन लाख सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे यासाठी तालुकावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कोरोना महामारी कालावधीनंतर तब्बल आठ महि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना कार्यकारिणीची बैठक शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत आमदार वैभव नाईक आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की सभेच्या सुरुवातीलाच कोरोना कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष मदत करणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच शासनाचे सचिव यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला मान्यता दिल्याबद्दल ही आभार व्यक्त करण्यात आले असल्याचे सांगतानाच एक ते 15 डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे या कालावधीत प्रत्येक तालुक्यात नवीन सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे तसेच या पंधरवड्यात दोन लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे यासाठी तालुकावार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे यात सावंतवाडी सतीश सावंत, कणकवली विकास कुडाळकर, दोडामार्ग जयेंद्र परुळेकर, वेंगुर्ला संदेश पारकर, कुडाळ संग्राम प्रभुगावकर, वैभववाडी बाळा भिसे, देवगड सुनील डुबळे, मालवण अतुल रावराणे, या सर्वांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना लेपटो माकडताप डेंग्यू मलेरिया हे साथ रोखण्यासाठी शिवसेनेचे माध्यमातूनही उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आगामी निवडणुका महाविकासआघाडी च्या माध्यमातून लढविणार जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल असे सांगितले जाणार असल्याची माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली. तसेच आगामी निवडणुका मध्ये सर्व संस्थांवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असल्याचे स्पष्ट केलं.
जिल्ह्यातील यापुढे सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार-:खा विनायक राऊत….
