पालकमंत्री उदय सामंत यांची भाजप वर टीका
*💫ओरोस दि.२८-:* महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकार सांघिक पणे काम करून राज्यात करत असलेला विकास भाजपाच्या डोळ्यात खुपत आहे तसेच आघाडी सरकारची यशस्विता पाहता आपले आमदार टिकवण्यासाठी सरकारवर टीका करून सरकारला बदनाम करण्याच्या पॅटर्न भाजपने आखला असल्याचा टोल जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत लावला सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत बोलत होते यावेळी खासदार विनायक राऊत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आमदार वैभव नाईक आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आधी उपस्थित होते. महाराष्ट्राचे आघाडी सरकार एक वर्षपूर्ती झाल्यानंतर भाजप या सरकारविरोधात राज्यभर पत्रकार पत्रकार परिषद घेत आहेत याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकारने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सांघिक पद्धतीने राज्याचा विकास केला आहे हा विकास विरोधकांमध्ये खुपत आहे तसेच आघाडी सरकारने केलेला विकास पाहता आपले आमदार पक्ष सोडून जाऊ नयेत भाजपमध्ये रहावे यासाठी भाजपने राज्यभर पत्रकार परिषद यांचा कार्यक्रम आखला आहे महाराष्ट्र सरकार वर टीका करण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम केवळ आपले आमदार टिकावेत यासाठी यासाठी असल्याचा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजपाला लगावला. टीका केल्याने आम्हाला स्फूर्ती मिळते आघाडी सरकार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याचा सक्षम पणे विकास करत आहे मात्र काही लोक विकास रखडला असल्याची टीका करत आहे विरोधकांच्या या टीकेतून आम्हाला स्फूर्ती मिळते आणि आम्ही जोमाने काम करतो असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच आघाडी सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्याचा विकास ठप्प झाला आहे याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषदा घेत आहेत मात्र राज्याचा होत असलेला विकास हेच त्यांना उत्तर असून हा विकार जनतेलाही दिसत आहे त्यामुळे त्यांनी त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे असा टोला फडणवीस यांना यावेळी नामदार उदय सामंत यांनी लावला. जिल्हा नियोजन ला आता शंभर टक्के निधी देणार कोरोना कालावधी सर्व योजनांवरील निधीला कात्री लावण्यात आली होती तसेच जिल्हा नियोजन च्या नेतेही 50 टक्के कात्री लावण्यात आली होत त्यामुळे विकासकामांना निधी मिळत नव्हता मात्र आता कोरोनाचं कहर थोडा फार कमी झाल्याने विकासकामांना निधी देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन च्या आराखड्याला लागलेली खात्री भरून काढली जाणार आहे या नियोजन चा उर्वरित शंभर टक्के निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आज पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.