ग्लोबल महाराष्ट्र च्या बातमीचा पुन्हा एकदा इफेक्ट
*💫सावंतवाडी दि.२८-:* शिरोडा नाक्यांवर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे काल एका महिलेच्या गाडीला अपघात होऊन ती किरकोळ जख्मी झाली होती. ही बातमी काल ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ने प्रसिद्ध केली होती. यांची दखल घेत त्वरित नगरपालिकेकडे हा खड्डा बुजवण्यात आला आहे. त्यामुळे सावंतवाडीकर नागरिकांना पुन्हा एकदा ग्लोबल महाराष्ट्र इफेक्ट दिसून आला आहे.