Headlines

परीट समाजाच्या वतीने सावंतवाडीत होणार श्री संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी साजरी

परीट समाजबांधवानी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज हा सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहरात वटसावित्री हॉल खासकिलवाडा येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी रविवारी २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोव्हिड मुळे ही पुण्यतिथी अतिशय साध्या पद्धतीत साजरी होणार आहे. यावेळी श्री संत गाडगेबाबा…

Read More

*स्वच्छता सर्वेक्षण २०२१ अंतर्गत समाज मंदिर परिसरात नगरपालिकेकडून जनजागृती

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८, समाज मंदिर परिसरात सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. यावेळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी कार्यक्रमावेळी जमलेल्या लोकांना याबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच स्वच्छता ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन देखील त्यांनी येथे जमलेल्या युवकांना केले आहे. तसेच घरगुती…

Read More

जिल्ह्यात एकूण 5 हजार 189 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 348; जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 189 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 348रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

सातार्डा-पाडलोस-सावंतवाडी एसटी सुरू करा

पाडलोस ग्रामपंचायतसह नागरिकांची मागणी ः आरोस, पाडलोसमधील प्रवाशांचे हाल *💫बांदा दि.१७-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी (वस्तीची गाडी) एसटी बस वाहतूक सेवा सध्या अनलॉकमध्ये पुन्हा पूर्ववत सुरू करावी. सातार्डा ते सावंतवाडी दरम्यान अनेक गावांतील नागरिकांना सकाळ व संध्याकाळच्यावेळी घर गाठणे किंवा कामासाठी बाहेर पडणे कठीण होत आहे. त्यामुळे पाडलोस ग्रामपंचायतने…

Read More

*शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

*जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आंदोलन* *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* केंद्र शासनाने ५ जून रोजी काढलेले कायदे शेतकऱ्यां विरोधी आहेत. या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत .हे शेतकरीविरोधी कायदे तात्काळ रद्द करा. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने ५ जून२०२० रोजी शेती विषयक तीन कायदे काढले ….

Read More

*चाकू हल्ला प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर येथील टेम्पो चालकावर सावंतवाडी शहरात पहाटे लूटमारीच्या उद्देशाने चाकूहल्ला करण्यात आला होता. त्या टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान कालच मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसात अटक असलेले दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती सरकारी वकील स्वप्नील कोलगावकर यांनी दिली आहे….

Read More

तळाशील-तोंडवळी येथे भूमिगत वीज वाहिन्यांचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

*माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून चांदा ते बांदा योजनेअंतर्गत ९४ लाख ८७ हजार रु. चा निधी मंजूर *💫मालवण दि.१७-:* माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी येथे भूमिगत वीज वाहिन्या करण्याचे काम मंजूर करण्यात आले.यासाठी ९४ लाख ८७ हजार रु. चा निधी मंजूर करण्यात आला. या…

Read More

सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याची दहशत

*💫वैभववाडी दि.१७-:* सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे.बिबट्याने धुमाकूळ घातला असून दिवसा जणांवर हल्ले करत आहे. त्याने अनेक जनावरे ठार मारली आहेत.तर अनेक जनावरांवर जीवघेणा हल्ला केला आहे.जखमी जनावरांचे पंचनामे वन विभागाने करून नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेले अनेक दिवस सहयाद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.दिवसा चारण्यासाठी गेलेल्या जनावरांवर…

Read More

महामार्ग समन्वय समितीचा१९चा दौरा पुढे ढकलला….

*💫सिंधुदुर्गनगरी, दि. १७-:* कोंकण महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांना १९ रोजी एका महत्त्वाच्या शासकीय बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आल्याने त्यादिवशी होणारा खारेपाटण ते बांदा अभ्यासदौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हा दौरा जानेवारी २०२१च्या पहिल्या आठवड्यात होईल, असे समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सतीश लळीत यांनी कळविले आहे. मात्र १८ रोजीचा हातखंबा ते खारेपाटण हा दौरा…

Read More

स्वयंसेवी संस्थांचे कार्य समाजाला हितकारक : खा. विनायक राऊत

*💫सिंधूदुर्गनगरी, दि. १७-:* सेवाभावाने कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्य समाजाला हितकारक असते. ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ या संस्थेने आतापर्यंत राबविलेले उपक्रम प्रेरणादायी आहेत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज श्री. राऊत यांची त्यांच्या तळगाव येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री.राऊत यांना आपले ‘वेडात मराठे वीर…

Read More
You cannot copy content of this page