सचिन देसाई यांची प्रभारी तालुका प्रमुखपदी नियुक्ती: संजू परब यांची माहिती..
⚡सावंतवाडी ता.११-: वेंगुर्ल-शिंदे गटातील शिवसेनेची तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून याबाबतची माहिती संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर नव्याने कार्यकारिणी नियुक्त करण्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नवीन प्रभारी तालुका प्रमुखपदी सचिन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही संजू परब यांनी जाहीर केले.
याबाबत बोलताना संजू परब म्हणाले, “ते सर्व राजीनामा का दिला हे मला माहिती नाही; परंतु त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते आमच्यासोबतच राहणार आहेत आणि कुठेही जाणार नाहीत. परिणामाची आम्हाला कोणतीही चिंता नाही.”
