कोल्हापूर येथील टेम्पो चालकावर सावंतवाडी शहरात पहाटे लूटमारीच्या उद्देशाने चाकूहल्ला करण्यात आला होता. त्या टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान कालच मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसात अटक असलेले दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती सरकारी वकील स्वप्नील कोलगावकर यांनी दिली आहे. तर कालच सावंतवाडी पोलिस स्थानकाला भेट दिल्यानंतर आयजी नी दोन्ही गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात येईल असे सांगितले होते.
*चाकू हल्ला प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी
