*💫वैभववाडी दि.१७-:* सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे.बिबट्याने धुमाकूळ घातला असून दिवसा जणांवर हल्ले करत आहे. त्याने अनेक जनावरे ठार मारली आहेत.तर अनेक जनावरांवर जीवघेणा हल्ला केला आहे.जखमी जनावरांचे पंचनामे वन विभागाने करून नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेले अनेक दिवस सहयाद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.दिवसा चारण्यासाठी गेलेल्या जनावरांवर बिबट्या हल्ला करत आहे.गेल्या महिन्याभरात सहयाद्री पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. सह्याद्री पट्ट्यातील नावळे गावातील महेश परशुराम रावराणे यांच्या मालकीच्या गाय व पाडीवर बिबट्याने हल्ला करून दोन्ही जनावरांना गंभीर जखमी केले आहे. यांच्यावर बुधवारी पशुवैद्यकीय अधिकारी अधिकारी विजय करपे यांनी गावात जाऊन दोन्ही जनावरांवर उपचार केले आहेत. यापूर्वी करूळ ,सडूरे,शिराळे ,कुर्ली या गावांतील अनेक जनावरे बिबट्याने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी वनविभागामार्फत मृत्यू झालेल्या जनावरांचे पंचनामे वन विभागाने केले आहेत. त्याच प्रमाणे जखमी जनावरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याची दहशत
