आरोग्य यंत्रणा सक्षम करताना रिक्त पदे भरण्यासाठी लवकर भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही;वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय इमारत लोकार्पण संपन्न *💫वेंगुर्ले दि.२५-:* सिंधुदुर्गातील जनतेचे आरोग्य सक्षम राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच भूमिका घेतली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान दुसरी लाट ओसरत असली तरी डेल्टा प्लस सारख्या नवीन विषाणूचा धोका आहे. तिसरी लाट…

Read More

विद्युत वाहिनी घराच्या छपराला चिकटली

रहिवाशांना धोका:झोळबे येथील स्थिती *💫दोडामार्ग दि.२५-:* विद्युत वितरणचे ग्रामीण भागातील अनेक कामांकडे दुर्लक्ष होत असून त्यांचा हा दुर्लक्षितपणा येथील नागरीकांसाठी धोकादायक ठरत आहे. असाच प्रकार झोळंबे येथे घडला असून झोळंबे इमारतीवरून ११ केव्हीची उच्च दाब असलेली वाहिनी गेली असून ती बदलण्यास विद्यूत विभाग अनेक निवेदने देऊनही टाळाटाळ करत आहे. सद्य स्थितीत ही विद्युत वाहिनी इमारतीला…

Read More

रेल्वे अपघातात भिरवंडे बिवणेवाडीतील मंगेश सावंत यांचे निधन

*💫कणकवली दि.२५-:* कणकवली तालुक्यातील भिरवंडे बिवणेवाडीतील टेंबकर घराण्यातील मंगेश बाळकृष्ण सावंत यांचे मुंबई (ठाणे) येथे 24 जुन रोजी दुपारी 1 वाजता रेल्वे अपघातात निधन झाले. मुंबई येथील नामांकित लिफ्ट कंपनी येथे मॅनेजर पदावर कार्यरत असताना गावातील तरूण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले.गावातील सामाजिक ,शैक्षणिक, धार्मिक व इतर सर्व कार्यक्रमात ते सहभागी असायचे. तरुणांचा आधारवड म्हणून…

Read More

रोणापालमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळणार

तिलारी कार्यकारी अभियंता रोहित कोरे ः नुकसानग्रस्त परिसराची केली पाहणी *💫बांदा दि.२५-:* रोणापाल खुटवळ भागातील भातशेती व हत्ती ग्रास गवताचे तिलारी कालव्याची भिंत कोसळून नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई तर देणारच परंतु सदर ठिकाणी असलेल्या नाल्यासाठी रिटेनिंग वॉलची भिंत घालून पाण्याचा प्रवाह भातशेतीत येणार नसल्याचे नियोजन करू, असे आश्वासन तिलारी कार्यकारी अभियंता रोहित कोरे…

Read More

आरोसमध्ये गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

*💫बांदा दि.२५-:* आरोसम माऊली मंदिरात विश्व हिंदु परिषद प्रखंड सावंतवाडी मार्फत गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवलेकर, सुनिल सावंत, आरोस ग्रा.पं.सदस्या मनीषा परब, माजी सरपंच केशव नाईक, माजी उपसरपंच बाबी परब, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, शिवसेना मळेवाड माजी विभागप्रमुख…

Read More

दळवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

*💫कणकवली दि.२५-:* कणकवली तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात, आंतरराष्ट्रीय योग दिन, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने योगासने व ध्यान करून साजरा केला. यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होता. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. तेजल कुडतरकर ही प्रशिक्षिका तर ध्यानसत्राचे प्रशिक्षक श्री. प्रशांत हाटकर सहा. प्राध्यापक या प्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

Read More

निगुडे-देऊळवाडीतील भगदाड श्रमदानातून बुजविले

*💫बांदा दि.२५-:* निगुडे-देऊळवाडीतील अंतर्गत रस्त्यावर चार दिवसांपूर्वी मोठाले भगदाड पडले होते. गावातील काही ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाने सदर धोकादायक खड्डा बुजविल्याने तात्पुरता तरी धोका टळला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरुपी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. चारदिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे निगुडे-देऊळवाडीतील अंतर्गत रस्त्याला भगदाड पडले होते. वाडीतील बापू गावडे, मनोहर नाईक…

Read More

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जलद बसफेरी सुरु करा

जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे विभाग नियंत्रकांना पत्र *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्गनगरीसाठी कणकवली आगारातून सकाळी ९ .३० वाजता सुटणाऱ्या बसफेरीमधून मुख्यालयामध्ये शासकीय कर्मचारी कार्यालयामध्ये जातात. शासकीय कर्मचाऱ्यांची सोय व्हावी या उद्देशानेच ही बसफेरी कार्यान्वित आहे. बसफेरी ही लोकल असल्याने सर्व थांब्यावर थांबत ओरोस येथे पोहचते. ही जलद बसफेरी तातडीने करण्यात यावी, असे पत्र जिल्हा परिषद…

Read More

पालकमंत्री उदय सामंत व सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब येणार एकाच व्यासपीठावर

दोघेही कट्टर राजकिय विरोधक असल्याने राजकिय वर्तुळाचे लागून राहिले आहे लक्ष्य *💫सावंतवाडी दि.२५ प्रसन्न गोंदावळे-:* गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टिकटिपण्णी करत आगपाखड करणारे सावंतवाडी चे नगराध्यक्ष संजू परब व पालकमंत्री उदय सामंत हे आज शहरात होणाऱ्या विकासकामांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.त्यामुळे दोघेही काय भाष्य करतात…

Read More

आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन सहकार्य करावे

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर कणकवली परबवाडीतील नागरिकांचे आवाहन *💫कणकवली दि.२५-:* कणकवलीत सापडलेला डेल्टा प्लस रुग्ण सद्यस्थितीत आपल्या घरातच असून त्याला सध्यास्थितीत कोणताही आजार नसल्याचे समजते.त्यामुळे कणकवली येथील परबवाडी रहिवासीनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेऊन रहिवाशांना सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक रहिवाशी दादा परब ,भीवा परब ,बबलू परब ,शैलेश परब यांनी केले आहे….

Read More
You cannot copy content of this page