विद्यार्थ्यांसाठी मंदार शिरसाट यांचे ‘तुमचे दाखले… आमची जबाबदारी’ मिशन

ठाकरे सेना आणि युवा मित्र कक्ष यांचे सहकार्य..

⚡कुडाळ ता.०३-: नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ शाखेमध्ये विद्यार्थ्यांना युवा मित्र कक्ष
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये, या उदात्त हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ शाखेतर्फे ‘तुमचे दाखले… आमची जबाबदारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. युवा मित्र कक्ष आणि मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांचे अर्ज मोफत उपलब्ध करून दिले जातील. दाखल्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबत तज्ज्ञांकडून पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन मिळेल. अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवसेना शाखा, कुडाळ येर्हे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी कुडाळ येथील शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४०५८१२१२१ किंवा ९९२३७४२१२१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page