दोघेही कट्टर राजकिय विरोधक असल्याने राजकिय वर्तुळाचे लागून राहिले आहे लक्ष्य
*💫सावंतवाडी दि.२५ प्रसन्न गोंदावळे-:* गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टिकटिपण्णी करत आगपाखड करणारे सावंतवाडी चे नगराध्यक्ष संजू परब व पालकमंत्री उदय सामंत हे आज शहरात होणाऱ्या विकासकामांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.त्यामुळे दोघेही काय भाष्य करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष्य लागून राहिले आहे. हल्लीच कुडाळ येथे सेना भाजपात झालेला राडा आणि त्यांनतर झालेले आरोप प्रत्यारोप यामुळे आजचा दिवस राजकीय वर्तुळासाठी महत्वाचा मानला जात आहे
