आरोग्य यंत्रणा सक्षम करताना रिक्त पदे भरण्यासाठी लवकर भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही;वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय इमारत लोकार्पण संपन्न

*💫वेंगुर्ले दि.२५-:* सिंधुदुर्गातील जनतेचे आरोग्य सक्षम राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच भूमिका घेतली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान दुसरी लाट ओसरत असली तरी डेल्टा प्लस सारख्या नवीन विषाणूचा धोका आहे. तिसरी लाट कधी येणार हे सांगता येत नाही. त्यामुळे मास्क नियमीत वापरून जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.वेंगुर्ले येथिल उपजिल्हा रुग्णालय तसेच कोविड सेंटरच्या नव्या इमारतीचे लोकार्पण श्री.ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राउत,आमदार दिपक केसरकर,जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी,पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले,शुभारंभ झालेल्या उपजिल्हा रुग्णालयात जास्तीत-जास्त आरोग्यसेवा देण्याचा आमचा मानस आहे.जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील रिक्त जागा भरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,तर कोरोना काळात चांगले काम करणार्‍या प्रशासनाचे त्यांनी यावेळी कौतूक केले.

You cannot copy content of this page