खारेपाटणमध्ये रेस्क्यु ऑपरेशन

जैनवाडीमध्ये अडकलेल्याना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास सुरुवात *💫कणकवली दि.२३-:* खारेपाटण गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून खारेपाटण जैन वाडी येथील सूमारे 10ते 15 घरे/कुटूंब पुराच्या पाण्यात असल्याने महसूल,पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोट मागवून आता खारेपाटण मध्ये रेस्क्यु ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. पावसाने खारेपाटण शुकनदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने खारेपाटणसह शुकनदी किनारी…

Read More

कणकवली शहरातील शिवशक्तीनगर व स्वामी समर्थनगरमध्ये पाणी शिरले

नगराध्यक्ष, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह नगरपंचायत टीमची धाव *💫कणकवली दि.२३-:* मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी रात्री पासूनच सुरु झालेल्या पावसाने कणकवली शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले. कणकवली शहरात शिवशक्ती नगर व स्वामी समर्थनगरमध्ये पाणी शिरल्याने शिवशक्ती नगरमधील काही घरांचा संपर्क तुटला होता. तसेच स्वामी समर्थनगर येथे जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांच्या घरात देखील…

Read More

गावाने गाववाल्यांसाठी निर्माण केला आदर्श

जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांचा अभिनव उपक्रम *💫कणकवली दि.२३-:* कोरोनाच्या आपत्तीने विश्र्व बदलले.अनेक चेहरे उघडे पडले.मदतीचे हात पुढे सरसावले.कोरोनावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू झाले.जांभवडे पंचक्रोशीत कोरोना वाढत होता.वाहतुकीची सुविधा नव्हती,गरीब जनतेला भाडे परवडणारे नव्हते.यामुळे गावातील म़ंडळींनी पुढाकार घेत एक संकल्प केला.आणि नागरिकांसाठी लोकसहभागातून कायमस्वरूपी अॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात आली. प्रामुख्याने कै.सिताराम(आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल…

Read More

दोडामार्ग तालुक्यात पावसाची कहर:जनजीवन विस्कळीत

अनेक गावांचे संपर्क तुटले:कॉजवे पाण्याखाली *💫दोडामार्ग दि.२३सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यासह इतर ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे नागरिकांचे हाल होत आहेत. मुख्यराज्यमार्गावरील अनेक काँजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर घोटगे परमे भेडशी हेवाळे येथील काँजवेवर पाणी आल्याने पाणी थेट आसपासच्या घरामध्ये शिरुन मोठ्या…

Read More

मुसळधार पावसामुळे आंबोली मुख्य धबधब्याजवळ कोसळली दरड…

सावंतवाडी-बेळगाव-कोल्हापूर मार्ग ठप्प:;माडखोल धवडकी परिसरात घरात घुसले पाणी_ *💫सावंतवाडी दि.२३ प्रसन्न गोंदावळे-:* मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ भली मोठी दरड कोसळल्याने सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग ठप्प झाला आहे. गेले चार दिवस मुसळधार सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे माडखोल धवडकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील घरात पावसाचे पाणी घुसले…

Read More

नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्याकडून कातकरी बांधवांना गृहपयोगी साहित्य वाटप

*💫कणकवली दि.२२-:* शहरात निमेवाडी येथे गवळदेव जवळ झोपडी बांधून राहणाऱ्या ७ कातकरी कुटुंबातील सुमारे २२ कातकरी बांधवांना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी गृहपयोगी साहित्य वाटप केले. कातकरी बांधवांच्या तीनही झोपड्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने या कातकरी बांधवांचे जीवनावश्यक व गृहोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी…

Read More

मुसळधार पावसामुळे कणकवलीत 12 घरांचे नुकसान;

5 जनावरे वाहून गेली *💫कणकवली दि.२२-:* कणकवली तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत बारा घरांचे नुकसान झाले आहे तर पाच जनावरे वाहून गेली आहेत. तसेच दुकाने व इतर आस्थापनांचे ही नुकसान झाले असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. महसूल विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कातकरी समाजाच्या तिने झोपड्या पूर्णता उध्वस्त झाले असून त्यातील 22 लोकांच्या स्थलांतर करण्याचे काम…

Read More

कातकऱ्यांच्या मदतीसाठी कणकवली शहर शिवसेनेचा सरसावली

जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत दाखविली सामाजिक बांधिलकी *💫कणकवली दि.२२-:* गेले सहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, गुरुवारी सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे कणकवली शहरात निमेवाडी येथे गवळदेव जवळ झोपडी बांधून राहणाऱ्या 7 कातकरी कुटुंबातील सुमारे 22 कातकरी बांधवांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. झोपड्या बांधून राहत असलेल्या कातकरी बांधवांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. व…

Read More

देवगड समुद्रात आढळले महाकाय जहाज

तांत्रिक बिघाडामुळे थांबल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सोडला सुटकेचा निश्वास   *💫देवगड दि.२२-:* देवगड समुद्रात वीस वर्षापूर्वी आढळलेल्या अलमुर्तदा जहाजाची आठवण करून देणारी घटना गुरूवारी सकाळी देवगडवासीयांनी अनुभवली. देवगड पवनकी समोरील समुद्रात उभ्या असलेल्या महाकाय जहाजाने सर्वांचीच झोप उडविली. मात्र हे प्रवाशी जहाज गुजरातकडे जात असल्याचे व तांत्रिक बिघाडामुळे थांबल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेबरोबरच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. देवगड पवनचक्कीसमोर समुद्रा गुरूवारी सकाळी एक महाकाय जहाज नागरिकांना दिसले. वादळी वातावरण व सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस अशा स्थितीत पवनचक्की समोर संशयास्पद महाकाय जहाज दिसल्याने…

Read More

गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांना देवगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने आदरांजली

देवगड-प्रतिनिधी : संपुर्ण आयुष्य ज्यांनी काव्य, गझल लेखनात लेखन पत्रकारीत घडविलेल्या सुप्रसिध्द गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांना देवगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. देवगड तालुक पत्रकार संघाच्यावतीने देवगड येथील उमाबाई बर्वे लायब्ररीच्या स्नेहसंवर्धक सभागृहामध्ये कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, प्रशांत वाडेकर, संतोष…

Read More
You cannot copy content of this page