खारेपाटणमध्ये रेस्क्यु ऑपरेशन

जैनवाडीमध्ये अडकलेल्याना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास सुरुवात

*💫कणकवली दि.२३-:* खारेपाटण गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून खारेपाटण जैन वाडी येथील सूमारे 10ते 15 घरे/कुटूंब पुराच्या पाण्यात असल्याने महसूल,पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोट मागवून आता खारेपाटण मध्ये रेस्क्यु ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. पावसाने खारेपाटण शुकनदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने खारेपाटणसह शुकनदी किनारी असलेल्या गावांना पुराचा फटका बसला आहे . रेस्क्यु ऑपरेशनप्रसंगी खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच रमाकांत राऊत, नायब तहसीलदार -राठोड, मंडळ अधिकारी मंगेश यादव, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह रेस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी आलेले आपत्तकालीन पथक यांच्यासह पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.

You cannot copy content of this page