कुडाळ भंगसाळ नदीला पूर आल्याने शेलटेवाडीची घरे अडकली पाण्यात

पावशी ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाकडून मदत सुरू

*💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ भंगसाळ नदीला पूर आल्याने नदीच्या काठावर असलेल्या शेलटेवाडीची घरे पाण्यात अडकली असून पावशी ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य सुरू आहे.दोन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.कुडाळ येथील हायवेला असलेल्या भंगसाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने यांचा फटका नदीकाठी असलेली गावे यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.शेतीही पाण्याखाली गेली. तसेच या नदीच्या काठावर असलेल्या कुडाळ हायवेला लागून असलेल्या शेलटेवाडीतील घरे पुराच्या पाण्याने वेढलेल्या अवस्थेत आहेत. या पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरांमध्ये काही लोके अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावशी ग्रामपंचायत सरपंच व त्यांची पुर्ण टीम, स्थानिक प्रशासन या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

You cannot copy content of this page