तरंदळे राेडवरील कलमठ-गावडेवाडी येथील ओहाेळावरील पूल पाण्याखाली

*💫कणकवली दि.२३-:* संततधार पडणार्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच राैद्ररुप धारण करीत झाेडपुन काढले. त्यामुळे कणकवली शहराला लागुन असलेल्या गावांमधील नदी नाल्याना पुर आला हाेता. पावसामुळे कणकवली महामार्गाला लागून असलेल्या तरंदळे मार्गावर कलमठ-गावडेवाडी येथील ओहाेळावरील पूलावर पाणी आल्याने पूल प पाण्याखाली गेला हाेता. त्यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत आजुबाजूच्या परिसरात पुरस्थिती निर्माण झाली हाेती.पाण्याचा प्रवाह माेठा असल्याने दाेन्हीबाजुकडील वाहतूक…

Read More

नगरवाचन मंदिर मालवणतर्फे ऑनलाइन सौ.विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा घेणार

*💫मालवण दि.२३-:* नगरवाचन मंदिर मालवणच्यावतीने सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिला गट हा मालवण तालुकास्तरीय असून तालुक्यातील शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थी विद्यार्थीनी यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. यामध्ये माझा आवडता खेळाडू, कोरोना आणि माझी जबाबदारी, ऑनलाईन शिक्षणपद्धती काळाची गरज या तीन विषयांपैकी…

Read More

कल्पेश सुद्रिक यांनी संविता आश्रम पणदूर येथे औषधे व जीवनावश्यक वस्तूचे केले वाटप

ना.अजित पवार यांच्या वाढदिवस केला साजरा *💫कणकवली दि.२३-:* सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष व कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संविता आश्रम पणदूर येथे औषधे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. याप्रसंगी सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना खजिनदार कृष्णा तेली, विद्युत संघटनेचे संघटक अक्षय गवस,…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून वृक्षारोपण

*💫मालवण दि.२३-:* स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण कडील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षातर्फे गुरुपौर्णिमा व वृक्षसंवर्धन दिन यांचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या सूचनेनुसार दि. १८ ते ३१ जुलै या कालावधीत माझी वसुंधरा उपक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यानी…

Read More

आम.नितेश राणे यांनी वागदे येथे पूरग्रस्तांची घेतली भेट;

आढावा घेत प्रशासनाला दिल्या सूचना *💫​कणकवली दि.२३-:* ​मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा कणकवली नजीकच्या वागदे गावाला बसला आहे. वागदे येथे अनेक घरामध्ये पुराचे पाणी गेले होते.​ ​त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली असून आम.नितेश राणे ​यांनी भेट देत आढावा घेतला. यावेळी सोबत कणकवली सभापती मनोज रावराणे, माजी सभापती दिलीप तळेकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच संदीप…

Read More

मुसळधार पावसामुळे पणदूर येथील हातेरी नदीला पूर

नदीकिनारी असलेल्या वाड्यांना सतर्कतेचा इशारा *💫कुडाळ दि.२३-:* गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार उडवला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे पणदूर गावाला लागून असलेल्या हातेरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या सिद्धार्थनगर, साईलवाडी, सावंतवाडा आदी वाड्याना पुराच्या पाण्यापासून धोका निर्माण झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिद्धार्थनगर वस्तीतील ३० ते…

Read More

खासदार,पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नाटळ मल्हार पुलांची पुनर्बांधणी

ब्रिज कोसळण्यास सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार :प्रथमेश सावंत *💫कणकवली दि.२३-:* कणकवली तालुक्यातीलनाटळ, नरडवे, दिगवळे दारिस्ते, शिवडाव या प्रमुख गावांना जोडणारा हा कणकवली कनेडी नरडवे रोडवरील नाटळ येथील मल्हार ब्रिज कोसळून पडल्यामुळे या सर्व गावांचा संपर्क तुटला आहे. योग्य नियोजन आणि दक्षता घेण्यास अपयशी ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागच या दुर्दशा होण्यास जबाबदार आहे, असा टोला शिवसेना…

Read More

खारेपाटण अजूनही धोक्याच्या छायेत

भल्या पहाटे बाजारपेठेत दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले *💫कणकवली दि.२३-:* खारेपाटण बाजारपेठेतील नागरिक पहाटे ४ वाजता साखर झोपेत असताना बाजरपेठेत पुराचे पाणी घुसल्याने व्यापारी तसेच नागरिकांची एकाच धावपळ उडाली. मुसळधार पावसाने खारेपाटण मधील शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून दुसऱ्या दिवशीही खारेपाटण मधील पुरपरस्थिती कायम असून खारेपाटण बाजारपेठेसह काही घरामध्ये दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे नागरिकाचे मोठ्या प्रमाणात…

Read More

आम.नितेश राणे यांनी खारेपाटण येथील पूरग्रस्त कुटुंबांची घेतली भेट

सुखनदीतील गाळ उपसा करून खारेपाटण पुरापासून सुरक्षित करणार *💫कणकवली दि.२३-:* खारेपाटण बाजारपेठेत पाणी घुसलेल्या कुटुंबांची भेट घेऊन आमदार नितेश राणे यांनी पुरस्थितीची पाहणी केली. पुरात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले.खारेपाटण बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग आणि सुखनदीचा गाळ उपसा करून बाजारपेठ सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले.पुराचे पाणी ओसरले नसल्यामुळे बाजारपेठेत जाण्याचे सर्व मार्ग…

Read More

कुडाळ भंगसाळ नदीला पूर आल्याने शेलटेवाडीची घरे अडकली पाण्यात

पावशी ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाकडून मदत सुरू *💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ भंगसाळ नदीला पूर आल्याने नदीच्या काठावर असलेल्या शेलटेवाडीची घरे पाण्यात अडकली असून पावशी ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य सुरू आहे.दोन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.कुडाळ येथील हायवेला असलेल्या भंगसाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने यांचा…

Read More
You cannot copy content of this page