*💫मालवण दि.२३-:* स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण कडील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षातर्फे गुरुपौर्णिमा व वृक्षसंवर्धन दिन यांचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या सूचनेनुसार दि. १८ ते ३१ जुलै या कालावधीत माझी वसुंधरा उपक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थ्यानी कोविड संदर्भातील नियम पाळून आपल्या गावी, वाडीत, परिसरात वृक्षारोपण करावे असे सांगण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी काही विद्यार्थ्यानी त्यांच्या गावी रोपे लावली आहेत. तसेच आज शुक्रवारी गुरुपौर्णिमा व वृक्षसंवर्धन दिन यांचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. बी. एच. चौगुले, डॉ. एस. एस. नाईक व स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून वृक्षारोपण
