ना.अजित पवार यांच्या वाढदिवस केला साजरा
*💫कणकवली दि.२३-:* सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष व कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संविता आश्रम पणदूर येथे औषधे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. याप्रसंगी सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना खजिनदार कृष्णा तेली, विद्युत संघटनेचे संघटक अक्षय गवस, संविता आश्रमाचे सेक्रेटरी संदिप परब,मधुकर भोगले,अक्षय झिडगे,संदेश राऊळ ,स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते.
