नगरवाचन मंदिर मालवणतर्फे ऑनलाइन सौ.विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा घेणार

*💫मालवण दि.२३-:* नगरवाचन मंदिर मालवणच्यावतीने सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिला गट हा मालवण तालुकास्तरीय असून तालुक्यातील शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थी विद्यार्थीनी यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. यामध्ये माझा आवडता खेळाडू, कोरोना आणि माझी जबाबदारी, ऑनलाईन शिक्षणपद्धती काळाची गरज या तीन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर बोलण्यासाठी ५ ते ७ मिनिटे वेळ दिलेला आहे. तर दुसऱ्या गटासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होऊ शकतात. यासाठी कोरोना आणि राजकारण, ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार, संवर्धन गड, किल्ल्यांचे या तीन विषयांपैकी कोणताही एका विषयावर बोलण्यासाठी ८ ते १० मिनिटे वेळ दिलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी आपला व्हिडीओ सुस्पष्टपणे चित्रित करून दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत पाठवावा. तालुकास्तररीय स्पर्धकांनी आपला व्हिडीओ (९५६१४७१५२५) या क्रमांकावर तर जिल्हास्तरीय स्पर्धकांनी आपला व्हिडीओ (८३९०६९४३३१) या क्रमांकावर आपल्या शालेय ओळखपत्राच्या फोटोसहित पाठवावा. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेचे ग्रंथपाल संजय शिंदे (९४२२२३४९५०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे व कार्यवाह नागेश कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page