तरंदळे राेडवरील कलमठ-गावडेवाडी येथील ओहाेळावरील पूल पाण्याखाली

*💫कणकवली दि.२३-:* संततधार पडणार्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच राैद्ररुप धारण करीत झाेडपुन काढले. त्यामुळे कणकवली शहराला लागुन असलेल्या गावांमधील नदी नाल्याना पुर आला हाेता. पावसामुळे कणकवली महामार्गाला लागून असलेल्या तरंदळे मार्गावर कलमठ-गावडेवाडी येथील ओहाेळावरील पूलावर पाणी आल्याने पूल प पाण्याखाली गेला हाेता. त्यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत आजुबाजूच्या परिसरात पुरस्थिती निर्माण झाली हाेती.पाण्याचा प्रवाह माेठा असल्याने दाेन्हीबाजुकडील वाहतूक ठप्प झाली हाेती.पुराच्या पाण्याचा स्राेत माेठा असल्याने कामानिमित्त कणकवलीला आलेल्या नागरीकांना पाणी ओसरेपर्यंत थांबावे लागले.ओहाेळाच्या बाजुलाच असलेले कलमठ-गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री गायत्री ब्राम्हणदेव मंदीर पुराच्या पाण्यात दिसेनासे झाले हाेते. तरंदळे रस्त्यावरुन दिवसा माेठी वाहनांची व नागरीकांची वर्दळ असते.कारण तरंदळे, माईण,भरणी, कुवळे,आयनल,चाफेड,साळशी, शिरगांवकडे जाणारी वाहने याच मार्गावरुन ये जा करत असतात.मात्र गुरुवारी पाऊस जाेरधार असल्याने वाहनांची वर्दळ तशी कमी हाेती.आज मुसळधार पडलेल्या पाऊसामळे पुलावर आलेले पाणी पाहण्यासाठी कलमठ-गावडेवाडी येथील नागरीकांनी माेठी गर्दी केली हाेती

You cannot copy content of this page