सावंतवाडी-आंबोली मार्ग पूर्ववत

*जिल्हा प्रशासनाची माहिती

*💫आंबोली दि.२३-:* मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ रात्री दरड व माती कोसळली होती. वाहतुकीस महत्त्वाचा मार्ग असल्याने दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस मोकळा केला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मुसळधार पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली धबधब्यानजीक रस्त्यावर दरड व मातीचा भाग कोसळला होता. त्यामुळे सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच महत्वाचा मार्ग असल्याने याची दखल घेत दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत केला आहे

You cannot copy content of this page