आम.नितेश राणे यांनी वागदे येथे पूरग्रस्तांची घेतली भेट;

आढावा घेत प्रशासनाला दिल्या सूचना

*💫​कणकवली दि.२३-:* ​मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा कणकवली नजीकच्या वागदे गावाला बसला आहे. वागदे येथे अनेक घरामध्ये पुराचे पाणी गेले होते.​ ​त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली असून आम.नितेश राणे ​यांनी भेट देत आढावा घेतला. यावेळी सोबत कणकवली सभापती मनोज रावराणे, माजी सभापती दिलीप तळेकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच संदीप सावंत, समीर सावंत​, वागदे तलाठी उपस्थित होते. जास्तीत जास्त नुकसान भरपाई पंचयादी घालून द्या असे तलाठी यांना निर्देश देण्यात आले. प्रकाश काणेकर, विनय काणेकर, सरगले यांच्या घराची पाहणी केली. त्याचप्रमाणे नदीचे पाणी रस्त्यावर कशामुळे आले. याचीही माहिती घेतली. भविष्यात असा प्रसंग येवू नये. याबद्दल उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

You cannot copy content of this page