खारेपाटण अजूनही धोक्याच्या छायेत

भल्या पहाटे बाजारपेठेत दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले

*💫कणकवली दि.२३-:* खारेपाटण बाजारपेठेतील नागरिक पहाटे ४ वाजता साखर झोपेत असताना बाजरपेठेत पुराचे पाणी घुसल्याने व्यापारी तसेच नागरिकांची एकाच धावपळ उडाली. मुसळधार पावसाने खारेपाटण मधील शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून दुसऱ्या दिवशीही खारेपाटण मधील पुरपरस्थिती कायम असून खारेपाटण बाजारपेठेसह काही घरामध्ये दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे नागरिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान खारेपाटण मधील सर्व रस्ते पुराच्या पाण्याच्या खाली गेल्यामुळे खारेपाटण मधील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

You cannot copy content of this page