एन.एम.एम.एस. परीक्षेत रामगड हायस्कूलचे यश
*⚡मालवण ता.२०-:* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत प्रगत विद्यामंदिर, रामगड या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत मिहीर मिलिंद गावकर, दीक्षा अनंत सावंत, दीक्षा विवेक मालंडकर, सानिका चंद्रकांत चोरगे, सायली संदीप मुणगेकर हे पाच विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते…
