रोटरी क्लबतर्फे शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धा

*⚡मालवण ता.२०-:* राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने रोटरी क्लब मालवण आयोजित व डॉ लीना लिमये पुरस्कृत शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि.२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी वयाची अट नाही. शाकाहारी नाश्त्याची पाककृती घरी बनवून आणायची आहे. पाककृती बनवत असतानाचा आपला व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवावा. चव, घटक व मांडणी यानुसार गुण दिले जातील. पौष्टिक पाककृती बनवायची आहे. कोणत्याही प्रकारची चायनीज पाककृती किंवा संबंधित घटक वापरायचे नाहीत. पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे दिली जातील. यामध्ये प्रथम क्रमांक – रु. १५००, आकर्षक चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक- रु. १२०० व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक- रु. १००० व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात6 येतील. नावनोंदणी दि. ३० ऑगस्टपर्यंत करावी. अधिक माहितीसाठी राे. डाॅ. लिना लिमये6 (9422076805) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page