राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलची प्रतिक्षा नाईक कोल्हापूर विभागात प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे मार्फत २०२१ मध्ये घेतलेल्या राष्ट्रभाषा प्रवेशिका परिक्षेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीती विद्यार्थीनी कु. प्रतिक्षा प्रदिप नाईक हिने २०० पैकी १७८ गुण प्राप्त करुन संपूर्ण कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राष्ट्रभाषा प्रवेशिकामध्ये विद्यालयातून साक्षी दयानंद वेंगुर्लेकर (द्वितीय), आनंद किरण कारेकर व रुचिरा प्रदिप बागायतकर (तृतीय), राष्ट्रभाषा सुबोधमध्ये विद्यालयातून इयत्ता नववीतील बसलेले ५२ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात मयुरी प्रशांत नार्वेकर व ममता प्रशांत नार्वेकर (प्रथम), कृतिका लिलाधर रेडकर (द्वितीय), तेजल गंगाराम गिरप (तृतीय) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या सर्वांना वैभव खानोलकर, मधुकर कुबल व उल्का वाळवेकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन विरेंद्र आडारकर, सेक्रेटरी रमेश नरसुले, कार्यकारिणी सदस्य, पालक, शिक्षक संघ सदस्य व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page