हर्षा ठाकूर यांचा परत घेतलेला पक्ष प्रवेश म्हणजे मातोश्रीची फसवणूकच:जयदेव कदम

*⚡कणकवली ता.०४-:* देवगड नगरपंचायतीच्या नगरसेविका हर्षा ठाकूर यांची भाजपा पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आले व त्यांनी लगेचच पालकमंत्राच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काल मातोश्री वर मोठा गाजावाजा करून परत केलेला प्रवेश हा सिंधुदुर्गातील स्थानिक नेत्यानी केलेली मातोश्रीची फसवणूकच आहे.असा टोला भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनी लगावला आहे. जन आशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रचंड…

Read More

कोविड काळात “वायडब्ल्यूए”चा रक्तदान उपक्रम अत्यंत महत्वाचा : समीर नलावडे

युथ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून कणकवलीत रक्तदान शिबीर *⚡कणकवली ता.०४-:* महिलांच्या हाताला काम आणि तरुणांना रोजगार हि आपल्या जिल्ह्याची गरज आहे. आणि याच वर्गाला रोजगारक्षम बनविण्याचे धोरण घेऊन जिल्ह्यात काम करत असलेल्या युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने आयोजित केलेला रक्तदान शिबीर सारखा उपक्रम आजच्या कोविडच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे. असे मत कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी…

Read More

आरटीपीसीआर टेस्टबाबत संपूर्ण कोकणात लागू एकच निर्णय लागू करा

परशुराम उपरकर यांची मागणी;चाकरमान्यांना त्रासापासून वाचवा *⚡कणकवली ता.०४-:* एका बाजूला जर राज्य सरकार आपत्कालीन कामांसाठी २००० कोटी खर्च केल्याचे सांगत असेल, तर केंद्राकडून निधी आला नाही तरी याच आपत्कालीन निधीमधून खर्च करायला काय हरकत होती? असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्टचं बंधन घालून प्रशासन चाकरमान्यांना जेरीस का आणतंय? आरटीपीसीआर टेस्टबाबत कोकणातल्या तीन जिल्ह्यामध्ये असे तीन…

Read More

मूर्तीशाळांमध्ये लगबग वाढली

वेंगुर्ला प्रतिनिधी- गणेश चतुर्थी अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच मूर्ती शाळांमध्ये लगबग वाढली आहे. नियोजित वेळेत गणेश सुबक व आकर्षक मूर्ती गणेशभक्तांना उपलब्ध करुन देण्यासाठी मूर्तीकार रात्ररात्र जागून काम करीत आहेत. सर्वांच्या चेह-यावर हसू आणणारा, मूर्तीकारांसहीत भजनी मंडळींना व्यासपिठ मिळवून देणारा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा गणेश चतुर्थीचा सण १० सप्टेंबरपासून…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सफाई कामगारांचा सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.०४-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सफाई कामगारांचा प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विधाता सावंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.व्ही.एस.चव्हाण, सदस्य प्रा.एल.बी.नैताम, प्रा.एम.एम.मुजुमदार यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. घनकचरा एकत्र करुन त्याची विल्हेवाट लावून सामाजिक आरोग्य टिकविण्याचे मौलिक कार्य सफाई कामगारांनी करीत…

Read More

जगदीश सापळे यांना ‘ऑल इंडिया कौन्सिल’चा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

*⚡वेंगुर्ला ता.०४-:* ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सिलेन्स या संस्थेद्वारे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण केले जाते. यावर्षी हा पुरस्कार वेंगुर्ला येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर टायपिग इन्स्टि्युट आणि श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन, वेंगुर्ला या संस्थेचे संचालक जगदीश सापळे यांना प्राप्त झाला. या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Read More

जिल्ह्यात आज आणखी ३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार २२९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ४१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

मिस युनिव्हर्स स्पर्धेत भक्ती जामसंडेकर उपविजेती

सावंतवाडीची कन्या:मुंबईत झालेल्या देशातील अनेक राज्यातील सौंदर्यवती झाल्या होत्या सहभागी *⚡सावंतवाडी ता.०४-:* मुंबई येथे नुकत्याच झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सावंतवाडीची सुकन्या भक्ती जामसंडेकर हिने उपविजेतेपद पटकवले आहे. मुंबई तील प्रसिद्ध जाईल एंटरटेनने भाईंदर येथील सुवी पॅलेस येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्राबरोबर हिमाचल प्रदेश, आसाम, बिहार आदी भागातील सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या….

Read More

राजू परुळेकर यांनी कुटुंबासह दिली कळसुलकर विद्यालय व सय्यद कनिष्ठ विद्यालयाला भेट

नगराध्यक्ष संजू परब यांचीही उपस्थिती सावंतवाडी शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय शाळेचे एक देणगीदार आणि हितचिंतक श्री. राजु परुळकर यांनी आज शाळेला सहकुटुंब भेट दिली. यावेळी एक उत्तम योगायोग म्हणजे सावंतवाडी नगरपरिषदेचे चे प्रथम नागरिक नगराध्यक्ष मा. श्री. संजय जगन्नाथ परब त्याच्या सोबत होते. सर्व पाहुण्यानी कै.सौ.लक्ष्मीबाई विष्णुपंत परुळकर हॉल मधे…

Read More

मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुस्थितत करा

केंद्रीयमंत्री नितीन गडकरीं जवळ कोकण-मुंबई प्रतिष्ठानची मागणी मालवण (प्रतिनिधी) मुंबई- गोवा महामार्गावरील पेण, इंदापूर, महाड, कशेडी घाट, खेड, चिपळूण याठिकाणी महामार्गावर खड्डे पडल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला असून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी कोकण – मुमबी सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश…

Read More
You cannot copy content of this page