केंद्रीयमंत्री नितीन गडकरीं जवळ कोकण-मुंबई प्रतिष्ठानची मागणी
मालवण (प्रतिनिधी) मुंबई- गोवा महामार्गावरील पेण, इंदापूर, महाड, कशेडी घाट, खेड, चिपळूण याठिकाणी महामार्गावर खड्डे पडल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला असून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी कोकण – मुमबी सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पडवळ यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षापासुन मुंबई- गोवा महामार्गाचे काम चालु आहे. बराच रस्ता पूर्ण झाला असला तरी पेण, इंदापूर, महाड, कशेडी घाट, खेड, चिपळूण या ठिकाणी वाहतुकिची अतिशय दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सवा निमित्त येत्या ८ दिवसामध्ये चाकरमान्यांच्या गाड्यांची वर्दळ जास्तच होणार आहे त्यामुळे रस्त्यांना पडलेले खड्डे, साचलेले पाणी यामुळे अपघात होण्याची संभावना आहे. त्यामुळे महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधीत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत असे अध्यक्ष योगेश पडवळ यांनी म्हटले आहे.
