*⚡सावंतवाडी ता.०४-:* जिल्हा परिषद शाळा निरवडे नं. १ च्या शिक्षिका दर्शना शिरसाट यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार व शुभेच्छा प्रदान कार्यक्रम निरवडे येथे संपन्न झाला. यावेळी निरवडे सरपंच प्रमोद गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, पाणलोट समिती अध्यक्ष हरी वारंग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गावडे ,माजी सरपंच काका गावडे, गजानन शिरसाट, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक सदस्य, अंगणवाडी सेविका, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रमोद गावडे म्हणाले, दर्शना शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना घडविताना पालक व विद्यार्थी यांच्यात कायम समन्वय साधला. त्यांच्या कारकीर्दीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेचे नूतनीकरण करून मोठी इमारत बांधण्यात आली असे सांगत गावडे यांनी त्यांच्या कार्याची माहिती देत प्रशंसा केली. माजी सरपंच काका गावडे म्हणाले, आपल्या शाळेच्या शिरसाट मॅडम जणू सरस्वतीच होत्या. त्यांच्या कार्याचा इतरांनी सुद्धा प्रेरणा घेण्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी सर्वच मान्यवरांनी, शिक्षकांनी, पालकांनी दर्शना शिरसाट यांनी शाळेसाठी, विद्यार्थांसाठी ,पालकांसाठी घेतलेली मेहनत खरोखरच प्रेरणादायीक असल्याचे सांगितले. सत्कार प्रसंगी बोलताना शिरसाट यांनी आपल्याला आलेल्या अनुभवाची तसेच शाळेबद्दल असलेल्या स्नेहभाव याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शाळेसाठी समई, घंटा देणगी स्वरुपात दिली. तसेच त्यांनी रुपये सहा हजार देत दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेतले. सर्वांनी शिरसाट यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेस्त्री मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम निरवडे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्ती समिती अध्यक्ष धर्माजी गावडे यांनी आयोजित केला होता.
शिक्षिका दर्शना शिरसाट यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम संपन्न
