राजू परुळेकर यांनी कुटुंबासह दिली कळसुलकर विद्यालय व सय्यद कनिष्ठ विद्यालयाला भेट

नगराध्यक्ष संजू परब यांचीही उपस्थिती

सावंतवाडी शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय शाळेचे एक देणगीदार आणि हितचिंतक श्री. राजु परुळकर यांनी आज शाळेला सहकुटुंब भेट दिली. यावेळी एक उत्तम योगायोग म्हणजे सावंतवाडी नगरपरिषदेचे चे प्रथम नागरिक नगराध्यक्ष मा. श्री. संजय जगन्नाथ परब त्याच्या सोबत होते. सर्व पाहुण्यानी कै.सौ.लक्ष्मीबाई विष्णुपंत परुळकर हॉल मधे होऊ घातलेल्या बालवाडी आनंद शिशु वाटि के संबधी तसेच शाळेतील विविध विकासकामांची माहिती घेतली व जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेचे सहाय्यक शिक्षक तथा एन सी सी अधिकारी श्री. गोपाळ गवस आणि इतर शाळेचे कर्मचारी यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले .माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर हेदेखील उपस्थित होते. सावंतवाडी चे नगराध्यक्ष आणि परुळकर कुटुंबायानी शाळेला शुभेच्छा दिल्या व शाळेच्या विकासाभिमुख प्रगतीबद्दल संचालक मंडळाचे कौतुक हि केले त्याच प्रमाणे प्रशालेच्या विकासासाठी सर्वतोपरी नगरपरिषदेच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्त प्रसाद गोठोस्कर यांना दिले

You cannot copy content of this page