मिस युनिव्हर्स स्पर्धेत भक्ती जामसंडेकर उपविजेती

सावंतवाडीची कन्या:मुंबईत झालेल्या देशातील अनेक राज्यातील सौंदर्यवती झाल्या होत्या सहभागी

*⚡सावंतवाडी ता.०४-:* मुंबई येथे नुकत्याच झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सावंतवाडीची सुकन्या भक्ती जामसंडेकर हिने उपविजेतेपद पटकवले आहे. मुंबई तील प्रसिद्ध जाईल एंटरटेनने भाईंदर येथील सुवी पॅलेस येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्राबरोबर हिमाचल प्रदेश, आसाम, बिहार आदी भागातील सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. सौंदर्य व बुद्धिमत्ता यांचा कस लागणारी ही स्पर्धा होती .अंतिम फेरीत सर्व स्पर्धकाना आजच्या पिढीचा सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता? हा प्रश्न विचारला होता मूल्य संस्कार, काळ व काळाचे अंतर… या भक्तीने दिलेल्या उत्तराला सर्व परीक्षकांनी कौतुक केले. सहनशीलता, कठोर मेहेनत, वाचन व सातत्य यामुळेच मोठ्या स्पर्धेचे उपविजेतेपद मला पटकवता आलें. अशी प्रतिक्रिया भक्ती जामसंडेकर हिने व्यक्त केली. या स्पर्धेचे परीक्षण तरन्नुम शेख, संगीता सिन्हा, दीप्ती शेंद्रे, यश थोरात, प्रिया राणा यांनी केले असून, या स्पर्धेला मयुरी शुभानंद, बाबू पटेल, कुणाल ठक्कर, राकेश सभरवाल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

You cannot copy content of this page