हर्षा ठाकूर यांचा परत घेतलेला पक्ष प्रवेश म्हणजे मातोश्रीची फसवणूकच:जयदेव कदम

*⚡कणकवली ता.०४-:* देवगड नगरपंचायतीच्या नगरसेविका हर्षा ठाकूर यांची भाजपा पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आले व त्यांनी लगेचच पालकमंत्राच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काल मातोश्री वर मोठा गाजावाजा करून परत केलेला प्रवेश हा सिंधुदुर्गातील स्थानिक नेत्यानी केलेली मातोश्रीची फसवणूकच आहे.असा टोला भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनी लगावला आहे. जन आशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून घाबरलेल्या शिवसेनेने मातोश्री ला खुश करण्यासाठी पालकमंत्र्याच्या हस्ते पक्ष प्रवेश झालेला असताना परत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या हर्षा ठाकूर यांना २३ जुलै २०२१ रोजीच भारतीय जनता पार्टी तुन ६ वर्षासाठी निलंबन करत असल्याची नोटिस दिली होती. हर्षा ठाकूर या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत नगरसेविका असतानाही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच उमेदवाराविरोधात काम केले होते . त्यानंतर समज देऊनही त्या वारंवार पक्ष विरोधात काम करत होत्या. यासाठी त्यांचे पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आले व त्यांनी लगेचच पालकमंत्राच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काल मातोश्री वर मोठा गाजावाजा करून परत केलेला प्रवेश हा सिंधुदुर्गातील स्थानिक नेत्यानी केलेली मातोश्रीची फसवणूकच आहे. हर्षा ठाकूर या भाजपाच्या अधिकृत नगरसेविका असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांनी संगितले.

You cannot copy content of this page