वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सफाई कामगारांचा सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.०४-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सफाई कामगारांचा प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विधाता सावंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.व्ही.एस.चव्हाण, सदस्य प्रा.एल.बी.नैताम, प्रा.एम.एम.मुजुमदार यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. घनकचरा एकत्र करुन त्याची विल्हेवाट लावून सामाजिक आरोग्य टिकविण्याचे मौलिक कार्य सफाई कामगारांनी करीत रहावे असे आवाहन प्राचार्य देऊलकर यांनी केले.

You cannot copy content of this page