Headlines

मालवणमध्ये २६ मे पासून वॉटरस्पोर्ट्स आणि सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद…

⚡मालवण ता.१९-:मालवणच्या यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरु असून पावसाळी कालावधीत जलपर्यटन बंद राहणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश ३१ ऑगस्ट…

Read Full News

मालवणमधील नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा..

⚡मालवण ता.१९-:मालवण शहरातील देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात, अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ ते ३१ मे या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या सोहळ्या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत, श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री…

Read Full News

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१९-: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १८ मे २०२६ पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ जून २०२६ पर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग…

Read Full News

“केवळ दाखविण्यापूर्ती योजना राबवू नका”…

समाज कल्याण समितीत सुमेधा पाताडे यांचा अधिकाऱ्यांना सूचना ⚡सिंधुदुर्गनगरी ता १९-:लाभार्थींचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रशासकीय कालावधीत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची आजची आर्थिक स्थिती काय? त्यांना या योजनेचा लाभ किती झाला याची माहिती देता येत नसेल, तसेच योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसेल तर योजना राबवून उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करत. समिती सदस्य सुमेधा…

Read Full News

वेंगुर्ला आडेली गावातील समस्याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष..

माजी ग्रा.पं. सदस्य विष्णू कोंडसकर यांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे.. ⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली हा विकसित गाव. या गावात मागील कार्यकालात आडेली सरपंचा सौ. यशस्वी कोंडसकर यांनी गावात बहुसंख्य विकासकामे राबवून गावाच्या विकासात निश्चितच ‘चांगली’ भर घातली आहे. परंतु सद्यस्थितीत आडेली गावातील विविध समस्याकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आडेली…

Read Full News

*२० मे पासून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध… ⚡सावंतवाडी ता.१९-: महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पॉलिटेक्निक – डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया दि. २० मे २०२६ पासून सुरू होत असून २२ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सावंतवाडीतील…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन…

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम…. ⚡सावंतवाडी ता.१९-: विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० व ३१ मे २०२६ रोजी भोसले नॉलेज सिटी परिसरात ही स्पर्धा संपन्न होणार असून,…

Read Full News

सावंतवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग…

नगरसेविका दीपाली भालेकर यांची तत्परता. ⚡सावंतवाडी, ता.१९-: सावंतवाडी शहरात मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या सूचनेनुसार भटवाडी प्रभाग क्रमांक १ मध्येही मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महिला व बाल कल्याण सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर यांनीही विशेष…

Read Full News

रस्ता अतिक्रमण प्रकरणी प्रशासनाचे लेखी आश्वासनानंतर मधुकर कुडव यांचे उपोषण मागे…!

⚡बांदा, ता.१९-: इन्सुली कुडवटेंब मुख्य रस्ता ते इसवटी मार्ग या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे मार्ग बंद झाल्याच्या तक्रारीवरून इन्सुली येथील मधुकर कुडव यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा तोडगा निघाला.सदर रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत कारवाई व्हावी, या मागणीसाठी मधुकर…

Read Full News

‘एल निनो’च्या सावटाखालील खरीप हंगामासाठी सज्ज व्हा…

मृद व जलसंधारणाचे उपाय योजण्याचे कृषी विभागाचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१९-: जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची चिन्हे आहेत. पॅसिफिक महासागरातील तापमान वाढीमुळे मान्सून कमकुवत होऊन पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसाच्या दोन सत्रात मोठा खंड पडणे किंवा एकूण पर्जन्यमान कमी राहणे असे परिणाम…

Read Full News

You cannot copy content of this page