सावंतवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग…

नगरसेविका दीपाली भालेकर यांची तत्परता.

⚡सावंतवाडी, ता.१९-: सावंतवाडी शहरात मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या सूचनेनुसार भटवाडी प्रभाग क्रमांक १ मध्येही मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महिला व बाल कल्याण सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर यांनीही विशेष पुढाकार घेतला आहे. प्रभागातील विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व साफसफाई आणि गटार दुरुस्ती कामांना सुरुवात करण्यात आली आहे. ही कामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका दीपाली भालेकर यांनी केले आहे.

नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरसेविका दिपाली भालेकर यांनी आपल्या प्रभागाची पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू केली आहेत. यामध्ये भटवाडी – प्रोफेसर कॉलनी ते वनश्री अपार्टमेंट पर्यंतचे झाडी मारून नाला साफसफाई करणे, भटवाडी – मोहन गावडे घरापासून सुभेदार घरापर्यंत गटार बंद झालेले आहे येथील माती काढून घेणे, कुणकेरी रस्ता – काजरकोंड पुलापासून जहूर शेख घरापर्यंत गटार बंदिस्त झाले आहेत येथील माती व पालापाचोळा काढून साफसफाई करणे, भटवाडी – दत्त मंदिर विठ्ठल मंदिर परिसरातील तिन्ही रस्त्यांच्या बाजूला असणारी गटार झाडी मारून साफसफाई करणे, भटवाडी – प्रोफेसर कॉलनी ते धोपेश्वरकर घरापर्यंत व पुढे विजयदुर्ग अपार्टमेंट पर्यंत गटारझाडी मारून साफसफाई करणे, भटवाडी – लक्ष्मीनारायण मंदिर पासून गोविंद चित्र मंदिर पर्यंत गटार माती काढून साफसफाई करणे, भटवाडी – गुप्ता होलसेल दुकानाच्या समोर गोठोसकर हॉल कडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावरील गटार पूर्णपणे बंद झाला आहे ती ओपन करणे, भटवाडी – भिसे गिरणीपासून पवन सोसायटीच्या मागून कुलकर्णी घरापर्यंत झाडी मारून नाला साफसफाई करणे, बाहेरचावाडा – कोलगाव दरवाजा ते रिक्षा स्टँड पर्यंत गटार साफसफाई करणे, बाहेरचावाडा – रिक्षा स्टँड ते जहूर शेख घरापर्यंत गटार साफसफाई करणे, बाहेरचावाडा – रिक्षा स्टँड ते पेट्रोल पंप पर्यंत झाडी मारून गटार साफसफाई करणे, बुराणगल्ली – पेट्रोल पंपपासून कुबा मज्जिद गटार साफसफाई करणे. याशिवाय प्रभाग क्रमांक १ मधील भटवाडी आणि बाहेरचावाडा परिसरातील संपूर्ण लाईट लाईनवरील झाडी हटविणे तसेच धोकादायक झाडांच्या फांद्या काढण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका दीपाली भालेकर यांनी दिली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेला प्राधान्य देत प्रशासनाच्या सहकार्याने ही कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगरसेविका भालेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page