वेंगुर्ला आडेली गावातील समस्याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष..

माजी ग्रा.पं. सदस्य विष्णू कोंडसकर यांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे..

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली हा विकसित गाव. या गावात मागील कार्यकालात आडेली सरपंचा सौ. यशस्वी कोंडसकर यांनी गावात बहुसंख्य विकासकामे राबवून गावाच्या विकासात निश्चितच ‘चांगली’ भर घातली आहे. परंतु सद्यस्थितीत आडेली गावातील विविध समस्याकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. आडेली खूटवळवाडी शाळा ते झाराप कडे जाणाऱ्या रस्ता दुतरफा वाढलेली झाडी बाबत जि. प. बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याच मार्गांवर धोकादायक खड्डे असूनही शासनाचे दुर्लक्ष आहे. आडेली पोस्ट थांबा ते श्री देव सोमेश्वर मंदिर मार्ग पुन्हा एकदा खड्डेमय होत आहे. याच रस्त्याबाबत नूतनीकरणाबाबत प्रस्तावाबाबत विचारले असता येथील ग्रामविकास अधिकारी चेतन अंधारी यांना पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.येथील मार्गांवरून एसटीची एक फेरी दररोज सुरु आहे.
आडेली हायस्कुल ते आडेली प्राथमिक शाळा नं. 1 दरम्यान माती मुख्य रस्त्यावर असून यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना धुळीमुळे आरोग्याच्या समस्या उत्पन्न होत आहेत. पावसाळ्यात याचा शालेय विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. आडेली पोस्ट स्टॉप व आडेली हॉस्पिटलनजिक दोन ” अतिधोकादायक ” खड्ड्याबाबत भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्य तात्या कोंडसकर यांना कल्पना देऊनही त्यांना या गोष्टीचे कोणतेही गांभीर्य नाही.सभापती शंकर घारे यांच्या सूचनेनुसार त्वरित आडेली खुटवळवाडी येथील स्ट्रीटलाईट समस्यासाठी काम सुरु करण्यात आले आहे. आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेट नसल्याने कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक स्थिती आहे.आडेली जांभरमळा शाळा गेटबाबत चक्क येथील केंद्रप्रमुख अनभिज्ञ आहेत. आडेली खुटवळवाडी ते वजराट तिठा या एरियात साईडपट्टीवरील पडलेली झाडे जीवघेणी ठरू शकतात. याच भागातील गटार उपसा कोण करणार, असा सवाल व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता गटार स्वच्छता, साफसफाई, धोकादायक झाडी कटिंग यासाठी नेमलेले ठेकेदार पावसाळा तोंडावर आला तरी गायब आहेत. आडेली जांभरमळा येथील धोकादायक वळणावर अनेक अपघात होऊन अनेकजण जायबंदी झाले आहेत, याचे शासनास कोणतेही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. आडेली खुटवळवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना शासनास भरघोस निधी खर्ची झाल्यानंतरही गोरगरीब जनतेबाबत काहीही फरक पडत नसल्याचे अधोरेखित होत आहे. आडेली आंबेडकरनगर येथील विहिरीचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल व्यक्त करण्यात आला आहे. आडेली येथील आठ महसूली गावासाठी असलेल्या आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या ‘ढीगभर’ समस्या सोडविण्याकडे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तातडीने पाहणी करून व वेळीच लक्ष पुरवून गोरगरीब जनतेला येथील डॉकटर्स डॉ. संजीवनी पाटील व डॉ. अश्विनी माईणकर यांच्यामार्फत मिळत असलेली ‘चांगली आरोग्यसेवा’ सुरळीत आरोग्यसेवा रहावी, यासाठी समस्या मार्गी लावून याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. आडेली पोस्ट स्टॉप व आडेली खूटवळवाडी येथे ग्रामपंचायत मार्फत गतिरोधक मागणीला शासनाने दुर्लक्षित केले आहे. विविध समस्यामुळे आडेली गावच्या विकासात अडचण निर्माण होत असून शासन निद्रिस्त आहे.

You cannot copy content of this page