Headlines

सावंतवाडी नगरपरिषदेकडून शववाहिनी सेवा सुरू…

नगरसेवक बाबू कुडतरकर: गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेला संपर्क साधावा.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी नगरपरिषद येथे शासनाच्या माध्यमातून शहरासाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंत्ययात्रेसाठी या गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन शिंदे शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले आहे.

Read More

वेंगुर्ला तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्यासाठी भाजपाचे नेहमी प्रयत्न…

मनीष दळवी:पाल गावात २ कोटी रुपयांच्या तीन विकास कामांची भूमिपूजन.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: तालुक्यातीलपाल गावातील तीन महत्वाच्या विकास कामांना मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळ निधीतून आणि बजेट मधून मिळून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन बुधवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजप तालुकाध्यक्ष विष्णू…

Read More

म्हापण-पाट येथे रिक्षा चालक-मालक संघटनेचा भव्य लकी ड्रॉ उत्साहात…

भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: म्हापण-पाट येथे रिक्षा चालक-मालक संघटना म्हापण-पाट व पिंपळपार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून रिक्षा चालक व स्थानिक ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाला संबोधित…

Read More

टाकाऊ साहित्याला लागलेल्या आगीत दोन दुचाकी जळाल्या…

कुडाळ : कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला आग लागली. ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात आली. कुडाळ पोलीसांसह अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तेथील झाडाखाली नजिकच्या गॅरेज मधील दोन नादुरुस्त दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्या आगीत जळून खाक…

Read More

बावीस हजाराची लाच घेताना उद्योग निरीक्षक पंकज शेळके लासलुचपतच्या जाळ्यात…

⚡ओरोस ता १-: सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके यांना एका कर्ज प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयाने त्याला 3 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.३१ डिसेंबर २०२५ रोजी…

Read More

कॉजवेचे काम सुरू असताना मिक्सरवाहू ट्रॉली कोसळून अपघात…

चालक बचावला:माड्याचीवाडी-रायवाडी येथील घटना.. ⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील माड्याचीवाडी-रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सरवाहू ट्रॉलीचा अपघात झाला. यात चालक सुदैवाने बचावला. त्याच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे.पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा मुख्य गाभा खचल्याने सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहू ट्रॉली येथे कॉजवेवरून…

Read More

डॉ. प्रफुल्ल गोडकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.०१-:वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गाऊडवाडी येथील मूळ रहिवासी डॉ. प्रफुल्ल बाबाजी गोडकर यांना कोकण राज्य अभियानातर्फे मुंबई येथे कोकणरत्न पदवी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कोकण राज्य अभियान संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार संपादक सचिन कळझुणकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. डॉ. प्रफुल्ल गोडकर हे गेली अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसायात…

Read More

डिजिटल शिक्षण रांगोळी व शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत वराडकर हायस्कूलचे यश…

⚡मालवण ता.०१-:जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली येथे शिक्षक व अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी आयोजित कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेत सहाय्यक शिक्षक मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक समीर अशोक चांदरकर यांच्या डिजिटल शिक्षण या रांगोळीला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती…

Read More

शिंदे गटाच्या ११ नगरसेवकांनी स्थापन केली ‘श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी’…

गटनेत्या म्हणून पूनम चव्हाण यांची नियुक्ती… ⚡मालवण,ता.०१-:राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या थेट नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांनी एकत्र येत श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी या नवीन गटाची स्थापना केली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र आणि ठरावाची प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली असून या नव्या गटाला मान्यता देण्याची विनंती करण्यात आली…

Read More

घरकुलाचा दुसरा हप्ता रखडला; लाभार्थी अडचणीत…

संजय गवस:आठ दिवसांत दुसरा हप्ता जमा न झाल्यास आक्रमक आंदोलन छेडण्याचा दिला इशारा.. ⚡दोडामार्ग ता.०१-:केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना दुसरा ७५ हजार रुपयांचा हप्ता वेळेत न मिळाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठराविक टप्प्यापेक्षा अधिक काम पूर्ण करूनही निधी न मिळाल्याने अनेक ठिकाणी घरबांधणी ठप्प झाली आहे.पंचायत…

Read More
You cannot copy content of this page