प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसांची मुदतवाढ…

सावंतवाडी ता.२२- : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असताना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यातच शासकीय संकेतस्थळ संथगतीने चालत असल्याने फॉर्म भरण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या. ही तांत्रिक अडचण लक्षात घेत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांमधून केली गेली. अखेर याची दखल घेत प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

तालुक्यातील कॉलेजमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. यात शासकीय संकेतस्थळ संथगतीने चालत होते. यावेळी तालुक्यातील किमान ५०% विद्यार्थ्यांना आरपीडी कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, असा आमचा मानस आणि प्रयत्न आहे. शासकीय साईटच्या प्रॉब्लेममुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असला, तरी विद्यार्थ्यांनी उपलब्ध वेळेत सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले फॉर्म त्वरित भरून घ्यावेत असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी केलं होते. या पार्श्वभूमीवर ही एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याने समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page