बांदा इन्सुली चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त ; ट्रकसह मुद्देमाल ताब्यात…

⚡बांदा ता.२१-: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा-इन्सुली पोलीसतपासणी नाका येथे नियमित वाहन तपासणीदरम्यान गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई करत 10 लाख 23 हजार 460 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आज पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण व श्री हेरलेकर हे ड्युटीवर असताना नियमित वाहन तपासणी करत होते. त्यावेळी ट्रक क्रमांक (एमएच ०८ डब्लू ११२२) संशयास्पद आढळल्याने त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच एएसआय नाईक व सहाय्यकपोलीसनिरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी येत पुढील कारवाई केली. यावेळी ट्रकमधून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
• ९ हजार ३६० रुपये किमतीचा ओक्स्मीत कंपनीच्या १२ बॉटल्सचा बॉक्स
• ११ हजार १०० रुपये किमतीचा रॉयल स्टॅग कंपनीच्या १५ बॉटल्सचा बॉक्स
• ३ हजार रुपये किमतीचा हेवर्ड फाईन व्हिस्कीच्या १२ बॉटल्सचा बॉक्स
• अंदाजे १० लाख रुपये किमतीचा ट्रक
असा एकूण मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई) अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page