कांदळगाव रामेश्वर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

*⚡मालवण ता.१९-:* भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात डॉ. कलाम यांच्या जीवनावरील तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य प्रकारातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले होते. या…

Read More

मच्छीमारी जाळ्यांच्या नुकसान भरपाईसाठी निधीची तरतूद करावी

*⚡मालवण ता.१९-:* नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अन्य कारणांमुळे जेव्हा मच्छीमारांची जाळी किंवा नौकांचे नुकसान होते, तेव्हा संबंधित मच्छीमारांना शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत प्राप्त होत नाही. त्यामुळे दरवर्षी बरेच मच्छीमार आर्थिक विवंचनेत सापडतात. शासनाने याचा विचार करून परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणामुळे किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या जाळ्यांच्या नुकसान भरपाई साठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी सर्जेकोट- मिर्याबांदा…

Read More

जिल्हास्तरीय टेबल टेनिसमध्ये पंकज तुळसुलकर द्वितीय

सावंतवाडीचा सुपुत्र:सर्वत्र होतेय कौतुक *⚡सावंतवाडी ता.१९-:* मालवण एज्युकेशन सोसायटीच्या पाटील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सावंतवाडीच्या सुपुत्राने उल्लेखनीय यश संपादन करत पुरुष खुल्या गटात पंकज तुळसुलकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर पुरुष दुहेरी गटात देखील द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यानी मिळवलेल्या या दुहेरी यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Read More

साने गुरुजी वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शन संपन्न

*⚡मालवण ता.१९-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस कर्मचारी व नाट्य कलाकार सुशांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सेवांगणचे…

Read More

एसटी अभावी विद्यार्थ्याचे हाल

एसटी सुरू करण्याचे मनविसेची मागणी *⚡सावंतवाडी ता.१९-:* राज्यात एस टि बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. परंतु, कोरोना नियमांचे पालन करून शाळा कॉलेज सुरू असल्याने, बस फेऱ्या आणि शाळा कॉलेज यांच्या वेळात ताळमेळ बसत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी शाळा कॉलेज व्यवस्थापशी समन्वय साधून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे…

Read More

गेले ते आपले नव्हते, आहेत ते पवार साहेबांचे

राष्ट्रवादी व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे;सावंतवाडी येथे घेतली आढावा बैठक *सावंतवाडी ता.१९ विनय वाडकर-:* राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत आज सावंतवाडीत उद्योग व व्यापार विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक जण पक्ष सोडून गेले, परंतु…

Read More

जागृती फाउंडेशनमुळे ३१ मुलांना मिळाला बालसंगोपन लाभ

*⚡ओरोस ता.१९-:सिंधुदुर्गनगरी : जागृती फाउंडेशन चाईल्ड लाईन सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील ३१ लाभार्थ्यांना ‘बालसंगोपन’ योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्यात आले. लाभार्थी बालकांच्या बचत खात्यात अनुदानाचा थेट लाभ मिळत आहे. या अनुषंगाने चाईल्डलाईनच्यावतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी लाभार्थी पाल्य व पालक उपस्थित होते. या जनजागृती कार्यक्रमात बालकांचे मुलभूत हक्क, बालकांवर होणारे अत्याचारांचे स्वरूप, बालक व…

Read More

संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत एकूण ८७ प्रकरणांना मंजूरी

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ८७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली . संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ . प्रथमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली . यावेळी सदस्य सचिव तथा तहसीलदार आर . जे . पवार , संजय गांधी योजना नायब तहसीलदार तानाजी रासम , नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत…

Read More

सिंधुदुर्ग युवासेना विस्तारक पदी रुची राऊत यांची नियुक्ती

आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन *⚡ओरोस ता.१९-:* शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत यांची सुकन्या कु रुची राऊत यांची सिंधुदुर्ग युवासेना विस्तारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रुची राऊत यांचे अभिनंदन केले आहे.तसेच…

Read More

रेंज नसलेल्या भागात ऑफलाईन पद्धतीने ई- पीकपाणी नोंदणी करा

जिल्हाधिकाऱ्यांकडे आ. वैभव नाईक यांची मागणी *⚡ओरोस ता.१९-:* जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील गावामध्ये मोबाईल रेंज नसल्याने ई- पीकपाणी ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन ई- पीकपाणी नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी ज्या ठिकाणी मोबाईल रेंज नसेल…

Read More
You cannot copy content of this page