संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत एकूण ८७ प्रकरणांना मंजूरी

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ८७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली . संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ . प्रथमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली . यावेळी सदस्य सचिव तथा तहसीलदार आर . जे . पवार , संजय गांधी योजना नायब तहसीलदार तानाजी रासम , नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे , नायब तहसीलदार उत्तम तांबे , संजय गांधी योजना समिती सदस्य स्वरूपा विखाळे , सुरेश रांबाडे , प्रविण वरूणकर , रुपेश जाधव , प्रदीप सावंत , अव्वल कारकुन श्रीमती आय . एच . पेडणेकर , बी . आर . जाधव , श्रीमती ए . ए . बागवे आदी उपस्थित होते . यावेळी संजय गांधी निराधार योजना ५६ , श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट अ ८ , श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना गट ब १३ , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ८ , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना १ व इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना १ अशा ८७ एवढ्या प्रकरणांना मंजूरी देण्यात आली .

You cannot copy content of this page