⚡आंबोली,ता. ११-: चौकुळ येथे रविवारी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात २६५ जणांनी लाभ घेतला.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ,गोवा आणि श्रीराम युवा कला क्रीडा मंडळ आंबोली तसेच फ्रेंडस सर्कल युवा मंडळ चौकुळ यांनी चौकुळ हायस्कूल येथे आरोग्य शिबिराचे रविवारी आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन पंचायत समिती सदस्य मायकल डीसोझा व शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख दिनेश गावडे यांच्या हस्ते झाले.यावेळी धारगळ येथील आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर तसेच स्टाफ उपस्थित होता. या शिबिरात २६५ जनांनी लाभ घेतला.यावेळी सुनील नार्वेकर, अभिजित मेस्त्री,राजू राऊळ, विजय गवस,सुषमा गावडे,उत्तम नार्वेकर, संतोष शेटवे,उल्हास पनवेलकर,दीप्ती नार्वेकर ,अरुण गावडे ,बाबू शेटवे ,हेमंत नार्वेकर, सुनील बांदेकर ,बाळा नार्वेकर ,राकेश गावडे ,झेवीयर डिसोजा, महेश पावसकर ,भारत गावडे आदी उपस्थित होते.प्रभारी सरपंच श्री गुलाबराव गावडे यांनी या शिबिरास भेट दिली.
