मनसेतर्फे स्वच्छता मोहिम संपन्न
वेंगुर्ला प्रतिनिधी– महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्याच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर व सागरेश्वर या ठिकाणी समुद्र किना-याची स्वच्छता करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्यावतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील किना-यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता करण्यात…
