वेंगुर्ला प्रतिनिधी– महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्याच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर व सागरेश्वर या ठिकाणी समुद्र किना-याची स्वच्छता करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्यावतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील किना-यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता करण्यात आली. यावेळी पर्यावरण सेनेचे अभिजित रगजी, नंदकुमार तालावंडेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, दत्ताराम गावकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर, आबा चिपकर, सुधीर राऊळ, नरेश देऊलकर, प्रकाश चिपकर, आबा परब, राकेश परब, निलेश मुळीक, मंदार नाईक, सहदेव फोडणाईक, जावेद शेख, शबाना शेख, रोहित म्हाकले, विनय धुरत, सुरज आमरे यांच्यासह ग्रामस्थही सहभागी झाले होते. या स्वच्छतेच्या निमित्ताने आरवली-सोन्सुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर ह्याने किना-यावर सुंदर अशा वाळू शिल्पातून जनजागृती केली. दरम्यान स्वच्छता मोहिमेमध्ये सुमारे ३५० किलो कचरा गोळा करण्यात आला. शिरोडा ग्रामपंचायतीकडे हा कचरा देण्यात आला.
