पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन…
देवगड ,(प्रतिनिधी) देवगड जामसंडे शहराला ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा असून या नगरपंचायत निवडणुकीत परिवर्तनाची गरज आहे.त्याकरिता शिवसेना राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या आघाडीला संधी द्या.या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल पर्यटनात्मक विकास तसेच सर्वसामान्य नागरिकांचे रस्ते ,पाणी पर्यटन विकासाबरोबर देवगड करीता आवश्यक असणारी ४५ कोटींची नळपाणी योजने करीता प्रयत्नशील रहाणार आहे.आपण सर्वांनी परिवर्तनाकरिता सांघिक प्रयत्न केले तर नागरिक व मतदारांवर प्रायश्चित करण्याची वेळ येणार नाही.असे प्रतिपादन पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी देवगड येथे बोलताना केले.
देवगड जामसंडे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने पालकमंत्री नाम.उदय सामंत यानी देवगड येथे येऊन उमेदवार व पदाधिकारी यांचेशी सुसंवाद साधला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी जेष्ठ नेते नंदकुमार घाटे ,युवा नेते संदेश पारकर,तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम,माजी सभापती रवींद्र जोगल,माजी उपसभापती संजय देवरुखकर,महिला आघाडी प्रमुख वर्षा पवार,युवा सेना प्रमुख निनाद देशपांडे,सौरभ माने,अमोल लोके,बंटी कदम व अन्य उपस्थित होते.प्रारंभी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण दिपप्रजवलन करून अभिवादन करण्यात आले.तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या पुढे बोलताना ते म्हणाले देवगड शहराचा मास्टरप्लेन तयार करण्यात येईल व नागरिक मतदारांच्या मनातील देवगड वसविण्याकरिता प्रयत्न करणार आहे.रस्ते विकास पाणी या सुविधेबरोबर पर्यटन विकास महत्वाचा असून देवगड चे रूप पालटण्याची जबाबदारी देवगड नागरिकाची आहे.असेही त्यांनी सांगितले. देवगड जामसंडे नगरपंचायत करीता नगरोथथन मधून३कोटी ,पर्यटन मधून ९ लाख,नागरी सुविधा अंतर्गत १.,कोटी २९ लाख एकूण ४.४५ कोटी एवढी रक्कम देण्यात आली या मधून विकासाची कामे किती पारदर्शक झाली यांच्या खोलात जात नाही परंतु या निवडणुकीत परिवर्तन महत्वाचे आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांनी चिपी विमानतळ, आंगणेवाडी पाणी समस्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही आश्वासने पूर्णत्वास नेल्या .तोच विकास देवगड मध्ये करायचा आहे .घराघरात जाऊन जनतेचा विश्वास संपादन करून शिवसेना राष्ट्रवादी माध्यमातून महाविकास आघाडीने केलेला विकास जनतेपर्यत मतदारपर्यंत पोहचवा असे आवाहनही नाम .उदय सामंत यांनी केले.
